गावे ही श्वास आपुला
गावे ही श्वास आपुला
भारत हा महान
खेड्यांमध्ये वसे
वीज पाणी सुविधा
जरी तिथे नसे
सगळं काही शहरात
गावात फक्त माती
काय सांगावे इथे
जपली जातात नाती
शहरामध्ये शिक्षण
नोकरी आणि बरंच काही
गाव देई शिकवणूक
जी कोठेच मिळणार नाही
शहरी लोकांचा इंडिया
नि भारत ग्रामीण लोकांचा
मिळून मिसळून राहा
प्रश्नच नसे भेदभावाचा
शहरे करती अर्थपुरवठा
गावे तर या भारताचा श्वास
येऊन राहून पहा
काहीतरी आहे गावामध्ये खास
शुद्ध हवा शुद्ध पाणी
नाही प्रदूषण
शहरात तर माणसेही
एकमेका देती दूषण
मिरची न् भाकर
हातावर ठेवा
सोबतीला इथे
आहे रानातला मेवा
नाही फुकाचा मोठेपणा
नाही ईर्षा इथे
मिळून सारे पुढे जाऊ
सारे होऊ मोठे
शहर नि गाव
दोघे आनंदाने नांदू
महान आपल्या भारताला
सुजलाम सुफलाम करु
