गावातील अंगण
गावातील अंगण
1 min
462
गावातील मातीचे अंगण
त्यात तारेचे कुंपण
वाळते नेहमीच वाळवण
जाळायला लाकडाचे इंधन
अंगणात धान्याच्या पोती
ढिगभर होती नाती
खेळायला काळी माती
जेवत होत्या पंगतीच पंगती
मधुर गोड विहिरीचे पाणी
खाण्यास भाकरी लोणी
तळ्याकाठी मुले पोहोती
मधू होती वाणी
साधी सरळ राहणी
फिरत होते अनवाणी
चालत होती नाणी
अशी आहे ग्रामीण भारताची कहाणी
