STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

3  

Sonali Butley-bansal

Others

गावाची संगत

गावाची संगत

1 min
547

 वेदसंस्कृतीपासून ते बहूसांस्कृतीकतेपर्यंत ,

कुंकवापासून ते टिकली पर्यत,

टाक कलम पासून ते महासंगणकापर्यत ,

सण वार व्रत वैकल्य उपास तापासापर्यत,


संस्कृतीच्या पाउलखुणा बघता बघता,

 सुटली संगत गावाची,

 हिरव्या गर्द वनराईची ,

बांधावरच्या आंब्याची,

 डोलणार्‍या शेताची,


 रानातून डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेची झाडाझाडाला बांधलेल्या झोक्याची,

 पाटातून झुळुझुळू वाहणाऱ्या पाण्याची ,

 परंपरा जपत मातीत रूजलेल्या गावजत्रेची, रेवड्या साखऱ्यांची जिलेबी शेवचिवड्याची, रंगबिरंगी चादरीवर थाटलेल्या लहान सहान दुकानांची,


त्या दुकानातील वस्तूंनी सजलेल्या झोपडी ची, अंगभर ल्यालेल्या कपड्यांची,

 वाटून खाल्लेल्या खाउची,

 झिरमीळ्या, पताकांनी सजलेल्या राउळाची, गाभाऱ्यातील नीरव शांततेची,

 नमस्कार केल्यावर आशीर्वादासाठी डोक्यावरून फिरणार्‍या हाताची


Rate this content
Log in