गाव
गाव
1 min
5
सुंदर माझं गाव न्यारं माझं गाव
हिरवी हिरवी झाडे भोवती , पक्षी सारे किलबिल करती
पाखरा मागे धावणारी ती खार , हळूच जांभूळ वेचून खाते
मी पण तिच्या मागे धावतो , शोध लावण्या तिला पळतो
त्या झाडावर झोका बांधून उंच उंच झोके घेऊन
त्या आंब्याच्या शेंड्याशी मी बघ कसा पोहचतो
ओढायावर जाता जाता जेव्हा मी थकून जातो
ओंजळीत पाणी भरून माझी तहान भागवतो
रान गुराने भरलेले , धान्य चुहुकडे भरलेले
सोन्यासारखा दिसतो मजला शेतात येणारं कणीस
हाती घेऊन कळते मजला या मातीचाच मी
कसा ? कधी ? दुरावून गेलो माझ्या या आईला
शोधून सुद्धा नाही गाव असा पहिला
