गाव
गाव
1 min
278
माझा ग्रामीण भारत
तुला कळणार कसा
तुझी संस्कृती शहरी
व्यथा जाणणार कसा
कधी मिटणार दरी
सख्या तुझ्या माझ्यातली
माडी यावी झोपडीत
व्यथा जाण गावातली
भोग सारेच आमच्या
कसे यावेत वाट्याला
कधी निसर्ग लहरी
बघ छळतो आम्हाला
दुःख ग्रामिण भागाचे
जाण शहरी बांधवा
नाळ जोडून गावाशी
पूल जरासा सांधावा
