STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

गाव

गाव

1 min
274

आजही गावात 

सुविधा अभाव

वर्चस्वासाठी तो

असतो प्रभाव


रस्ता कच्चा सदा

धुराळा उडतो

पावसात सारा

खड्डयात बुडतो


टँकरचे पाणी

भांडणे वाढवी

माणूसकी तेथे

पाण्यात विरावी


गावाचा चेहरा

बदलत आहे

गावपन पुन्हा

हरवले आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन