STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

4  

.प्रमोद घाटोळ

Others

गाव

गाव

1 min
127

सूर्य मावळतीच्या संगे

येई गोठ्यात गुरंढोरं

वासरू हंबरत येई

म्हशी गाई म्होरं म्होरं


मधू साखर पेरात

तशी भाकरीला गोडी

कधी सणसुदीला गावात

शिजे पुरणाची पोळी


सडा अंगणात शिंपे

अबोल पिवळ्या शेणाचा

परसात माड उभा

त्याशी शेंदूर मानाचा


किती माणसे ही साधी

गर्जे आभाळाचे बोल

जणू मोहल्ला कुटुंब

प्रत्येक माणसाला मोल


चाले सत्संग देवळात

वाजे मृदुंग एकतारी

ग्राम वाटे एक शाळा

प्रेम वाहणारी गाडी


Rate this content
Log in