गाव
गाव
1 min
378
सोनेरी पहाट,
अफाट निरभ्र आकाश,
उजळला देवाच्या गाभाऱ्यात,
जणू दिव्यांचा प्रकाश,
पाखरांच्या किलबिलाटाने,
आसमंत गजबजून गेलं,
झोपी गेलेले गावही,
हळूहळू जागी झालं,
लगबग झाली,
सुरु सर्वत्र कामाची,
सानंद मी पाहून,
सुंदर पहाट गावाची,
डोंगराच्या कुशीत,
वसलेले ते गाव शांत,
साऱ्या जगापासून दूर,
एकटं बसला निवांत
