गाव परंपरा व संस्कृती
गाव परंपरा व संस्कृती
परंपरा गावाची हो न्यारी ...
स्वागतोत्सव असतो येता पाहुणे दारी..
देशाचा निवास असतो खरा गावात ..
संस्कृती ही जपल्या जाते फक्त गावात..
गाव असतो खरा वारसदार देशाच्या संस्कृतीचा..
मार्ग ही निघतो गावातूनच देशाच्या प्रगतीचा..
अन्न धान्य शेती वाडी...
नसतो धूर नसते गाडी..
नांदते प्रकृती आनंदाने गावात..
काय उरले असते हो मोठ्या नावात..
संस्कृतीचे राखणदार आमचे गाव..
आपुलकी व माणुसकीला नसतो भाव...
परंपरागत व्यवसाय असतो शेती जिथे. ..
अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथे...
अन्न धान्य पाऊस पाणी पुरवतात झाडे...
यांची ही राखण करतात गावकरीच गडे..
झाली का एकदा प्रगती गावाची..
खात्री पक्की आहे देशाच्या विकासाची..
म्हणूनच म्हणतात ना..
करा विकास गावाचा..
हाच मूलमंत्र देशाच्या प्रगतीचा...
