गाठोडे
गाठोडे
1 min
228
गतदिनांचे वळून गाठोडे,
टाकले त्यास पाठीशी,
निसटली काही क्षणे,
चोरपावलांनी कशी?
स्वप्नांचे वळून गाठोडे,
ठेवले जरी उशाशी,
निसटली धिटुकली स्वप्ने,
चोरपावलांनी कशी?
आठवांचे वळून गाठोडे,
धाडले मनाच्या तळाशी,
निसटली ती आठवण,
चोरपावलांनी कशी?
इच्छांचे वळून गाठोडे,
कवटाळले त्यांना उराशी,
निसटली एक इच्छा,
चोरपावलांनी कशी?
प्रेमाचे वळून गाठोडे,
रुजवले शब्द स्वतःशी,
उलगडणार न केव्हाच,
दाटे हुंदका कंठाशी!
