गाथा राणी लक्ष्मीबाईची
गाथा राणी लक्ष्मीबाईची
ऐका गाथा राणी लक्ष्मीबाई ची..
कथा आहे ही तिच्या शौर्याची..
लहानपणीच भिनले वारे स्वातंत्र्याचे..
दूर सारण्या राज्य गुलामगिरीचे..
थोर शिष्या ती तात्या गुरूंची..
महती गावी ती थोडीच तिची..
बनून क्रांतिगुरू हादरवले शासन इंग्रजांचे..
इतिहास थकत नाही गाता यशगान तिच्या पराक्रमाचे...
संगठित केले साऱ्या भारतीयांना ...
बनवली महिलांची एक गुप्त सेना..
घाबरवून सोडले हो जुलमी इंग्रजांना..
स्वातंत्र्याची महती पटवून दिली सर्वांना..
झाशीच्या राणीचा पदभार सांभाळताना..
परवा नव्हती तिला आपले प्राण त्यागताना..
देशसेवेसाठी एक उदाहरण होते आयुष्य जिचे...
इंग्रजांना हद्दपार करण्याचे एकच उद्दिष्ट तिचे...