STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

गाथा मराठीची

गाथा मराठीची

1 min
161

अक्षर अक्षर गुंफून छान

देखणी शब्दमाला सजली

सुरेख शब्दमाला गुंफून

उत्तम वाक्य रचना बनली....


शब्दभांडार लागले जमायला

शब्दभांडार मना देई आनंद

चारोळी, कविता तयार झाली

आता बनू लागला छान अभंग.....


माय मराठी भाषेचे सौंदर्य

सजले सवरले  कोंदणात आज

अलंकारिक सुंदर शब्दांचा

चढवला बिनधास्त सुरेख साज.....


कर्मभाषा माय मराठी माझी 

मातृभाषा मायबोली माझी

कर्मभूमी माऊली माझी ही

राजभाषा लाडली ही माझी.....


मायभूमी मराठी आहे माझी

शूरवीर थोर शिवबांची

संतांची ही पुण्यभूमी 

जाणकार आहे सुसंस्कारांची...


भक्तीचे गायीले इथे गीत

या मराठी मायबोलीने

भाषेची आहे शान ही

जपला वारसा संस्कृतीने......


साधी सोपी झोकदार

मराठी भाषा फार लयदार

गुणगान गावे किती तिचे

इथला मानव इमानदार....


काय वर्णावी माय भाषेची श्रीमंती

चौदाखडीच्या कोंदणातून सजते

विरामचिन्हांच्या सौंदर्याने नटते

मराठी भाषेची समृद्धी जगात पसरते...


गाथा मराठीची वर्णावी किती

सर्व शब्दालंकार आहेत झोकदार

मराठीचा ध्यास सदैव आहे मनी

गोडवा मराठी भाषेचा आहे लयदार...


Rate this content
Log in