गाथा महाराष्ट्राची
गाथा महाराष्ट्राची
1 min
193
ऐका गाथा महाराष्ट्राची फार आहे
रंगात रंगलेला सुंदर मोर आहे
राजे संत विचारवंत घडले या मातीत
माणुसकीने भरलेले लोक थोर आहे
सण पुरणपोळी चर्चित सगळीकडे
या महाराष्ट्राची आम्ही पोर आहे
गडकिल्ले विरासत मोठी महाराष्ट्राची
नदी झाड निसर्ग हिरवा गार आहे
सिनेमा लावणी नाटक यांचे घर मुंबई
मराठी लोकांचा महाराष्ट्र सार आहे
गाथेची सुरुवात 1 मे 1960 ला करूनी
हा महान महाराष्ट्र आमचा गुरुर आहे
