STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

गारवा

गारवा

1 min
393

रखरखणारा सरला वैशाखवणवा

श्रावणसरी घेवुनी आल्या गारवा

तापलेली रापलेली होती वसुंधरा

गारवा घेवुनी आल्या पाऊसधारा


फुलवेली चिंबचिंब भिजलेल्या

गारव्याने भासे थोड्या लाजलेल्या

चराचर कसा हिरवागार नटलेला

डोळ्यांत निसर्ग देखणा साठलेला


तुझ्या भेटीची मनास लागली आस

गारव्यात ये मज भेटण्यास खास

वाटेला तुझ्या, मी लावावी नजर    

अचानक व्हावास तू समोर हजर


सोबतीने करु चल निसर्ग सफर

गार गार वाऱ्याचा धरून पदर

दवबिंदूंनी सजलेली सुंदर पाने

मोहित करणारी हिरवीगार राने


भुलवतो गड्या तुझ्या रुपाचा गोडवा

नभी शोभावा जसा पुनवेचा चांदवा

श्रावणसरींनी चराचर असा नटावा

तुझ्या प्रितीतला गारवा मला भेटावा


Rate this content
Log in