गारवा
गारवा
1 min
11.6K
थेंब चांदण्याचे भिजले दवात
सोनसळी किरणे आली वेगात
मनपाखरु शहारले स्पर्शिता सुमन
गारवा झोंबला आसमंत सुखान्त
पर्ण पालवी हसता मनात
इवलेसे फुल स्वैर झोकात
गंध मातीचा दरवळला
मल्हारधुनी सुर नादावता कानात
पायवाट पाहते वेग पावलांचा
मनभर आनंद रस्ता निवांत
आठव माघारी मन वळता
गार झुळूक प्रसन्न परसात
साठव हवाहवासा चित्त भरात
हृदय शोधते तोच एकांत
नसते अशक्य येथे काही
करु नये कधी कसला आकांत