गारवा
गारवा
1 min
314
डोंगराने पांघरली बर्फाची चादर
थंडीनेही केला कहर
प्रेमाला आला बहर
गवतावर दवबिंदू जणू हिरवे पाचू
मागे वळून बघता गाली गोड हसू
समोर घनदाट धुक्याचा रस्ता
नकळत तिचा हात हातात घेतला हसता हसता
कल्पनेने ओठावर ओठ टेकले
शब्दही गारठुन गोठले
मखमली स्पर्शाने नातं झालं घट्ट
नको स्वेटर कानटोपीचा हट्ट
गुलाबी थंडीचा अंगावर शहारा
ही थंडी म्हणावी का तिला म्हणावं जादूगार
क्षणात करते प्रत्येक मनाला टवटवीत हिरवेगार
