STORYMIRROR

Pradnya Ghodke

Others

3  

Pradnya Ghodke

Others

गाणे तुझे गायले....!

गाणे तुझे गायले....!

1 min
158

गळे ताणले तयांनी,

सरसावुनी पुढे आले..

तुझे खोल आर्ततेत,

होते गाणे रूजले...! १.


रोखल्या लक्ष नजरा,

तुझा धाक मंजुळ दरारा..

तरी..! गाव मला हे,

लुटारूंचेच वाटले जरा...! २.


तुटले मी ही आतून, 

...फितूर श्वास झाले..

गेले आहारी तुझ्या,

...'व्यसनी' मला म्हणाले...! ३.


प्रत्येक शूल तेव्हा,

होता जरी कोवळा!

तयात उध्वस्त लाखो,

करी लाचार दिवाण्यां घायाळा...! ४.


प्रिती कुणी करावी?,

उरात भाला ज्याच्या..

तू पंख छाटले त्यांचे,

जे प्राक्तनी माझ्या नशिबाच्या..! ५. 


तुझा परिसस्पर्श भाग्य,

मखमली तारूण्य कोवळे..

मी लपेटूनी प्रीत-भावे,

होते गाणे तुझे गायले...! ६.

होते गाणे तुझे गायले....!!


Rate this content
Log in