गालावरचे हसू
गालावरचे हसू
1 min
454
ओठावरती काळा तीळ
पाहुन हसला तो...
ती हसली त्याच्याकडे पाहून
तो हसला परत...
तिच्या दोन्ही गालावरती पडल्या खळ्या
हसू त्याचे पाहता...
कळी तिची फुलली
त्याचेही डोळे लुकलुकले...
दोघांच्या गालावरचे ते हसू
जाता येता पाहात होते सर्वजण...
कट्ट्यावरचे जाणते आजी आजोबा
दाबून आपले गालावरचे हसू
आठवत होते आपले तरूणपण!!!
