STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

गागरा

गागरा

1 min
686

गोंधळच उडाला माझा

गागऱ्याचा आला लोट

उडाले कपडे नि कचरा

झाली कामाचीही खोट


वैतागली बायामाणसं

डोळ्यातच गेला कचरा

चोळून डोळे होता लाल

 अश्रुंचाही झाला निचरा


 सुचेना साऱ्यांना काहीच

 करावा काय बरे उपाय

 जमले सारे एका ठिकाणी

 केला घरी बसण्याचा पर्याय


शमले वादळही यथावकाश

गागरा सारा जमला भूईवर

केसांत बसला अडकूनच

ढीगच जमला मग डोईवर


पावसाचे घटलेय प्रमाण

जलसंचयही आपण करू

गागरा खाली बसवायला

त्यावर पाण्याचा मारा करू


Rate this content
Log in