एवढं करशील का?
एवढं करशील का?
1 min
678
एवढं करशील का मानवा,
मानवतेचे दोर अखंड ठेवून
संस्कारांचे बंध आठवून,
अंतरात प्रेमगंध साचवून,
एवढं करशील का मानवा,
मुखावर हास्य पेरून,
समतेची लय बांधून,
जाती भेद विसरून,
एवढं करशील का मानवा,
मनात कृतज्ञ भाव आणून
नकारभाव सारे जाळून,
कष्टाचे जीवन वाहून,
एवढंच करून अनंत हो,
परमपित्याशी एकरूप हो,
दिगंतात त्या विलीन हो,
आयुष्य असे अनुरूप हो!
