एकवीस एप्रिल
एकवीस एप्रिल
सातव्या दिवसाची सुप्रभात ही..!
सा रे ग म प ध नी सा
त थ ड ध न ह ळ क्ष ज्ञ
व्या धी हटविण्यासाठी
दि नरात घरीच राहण्याचा केला यज्ञ..
व टवट बंद फर्मान काढले
सा टे लोटे कामाचे केले
चि डचिडीचे प्रश्न सारे
सु गावा लागण्या आधी संपवले..
प्र थम माझी अंघोळ देवपूजा
भा तडाळीचा कुकर तिला सजा
त द्नंतर चहा पोहे मला नास्ता
हि च्या चालूच त्या खस्ता..
पण
आज साट्यालोट्यात बदल केला
सारा भार माझ्या खांद्यावर घेतला
म्हंटले तिला थोडा आराम देऊ
थोडी तिचीही बाजू जाणून घेऊ..
आज मी प्रजा, ती राजा
राणीची माफ करू सजा
इजा बिजा तिजा टिकला दुपार पर्यंत
चारचा चहा हाती येता झाला अंत...
कधी नव्हे ते उफाळून येता प्रेम
तिला वाटले चुकला की काय नेम
काहीतरी असेल यांची गेम
त्यांचे नी माझे वागणे असते सेम.
पितळ उघडे पडले
मुलांची एन्ट्री होता क्षणात
तीच म्हणते मला आवरा
हळूच सांगून थोडे लाडिक कानात...
म्हंटले
कुठला कोरोना फरोना
घेऊन बसलीस मनात
मस्त मजेत वेळ घालवू
घरात बसून गं आनंदात..!
