एकटा
एकटा
1 min
194
हसण्याचेे माझ्या वाटले नवल लोकांना
कारण दुःखाचा बाजार मी मांडल नाही
होते प्राक्ततनात माझ्या स्वीकारले ते
अन्य कशाची आस मी केेेेलीच नाही
आहे ओळखण्यास कठीण पिंड माझा
जगण्याची माझ्या तर्हा कुणा कळली नाही
भेटले जेे कोणी आपलेसेे केले तयांंना
नाही भेटले जेे त्यांचा पिच्छा केलाच नाही
भले तुलनेत इतरांच्या पावलो काही उणे मी
ठेवूूून गहाण स्वाभिमान मार्ग माझा सोडलाच नाही
वागणे माझे विचित्र वाटते काही जणांना
मार्गस्थ मी एकटा अशांंची पर्वा केेलीच नाही
