एकटा राहुन पाहा
एकटा राहुन पाहा
1 min
11.2K
गायला प्रेक्षकांची गर्दी
हवीच का प्रत्येकदा
कधीतरी मग त्यांच्याविना
एकदातरी गाऊन पाहा
का त्या क्षितीजाला
लक्ष्मणरेषा मानतो
त्यापलीकडे कधी तु
एकदातरी जाऊन पाहा
सारीच मोहमाया मग
विसरायला सरबत पण
ग्लासभर घुट घुट करत
एकदातरी पिऊन पाहा
का म्हणुन हवेत लोक
सदासोबतीला तुझ्या
एकदातरी किनारावर
एकटा पण राहुन पाहा
का प्रत्येक गोष्टीत
पहिला येण्याची घाई
करतो कधीतरी एकदा
शेवटि पण येवुन पाहा
नेहमी तोंडाचे चोचले
पुरवण्यासाठी खातो मग
आज एकदातरी फक्त पोट
भरण्यासाठी खाऊन पाहा
