एकलकोंडा
एकलकोंडा
1 min
544
हल्ली भीती थोडी, ज्यास्त वाटायला लागलीय.
माझी सावली सुध्दा, माझ्यापासून धावतीय.
धावायचं तर सगळ्यांनाच होत, जिंकण्यासाठी.
नैराश्य खूप सार आणलं होत, विकण्यासाठी.
विकले जाते ईथे सर्वकाही, सुख सोई आणी भावना.
कोणता का होईना, रस्ता तरी दावना.
रस्ते मात्र खरे असतात, कधी संपत नाही.
प्रवाशीच ईथे असंतुष्ट, सारखे मागे वळून पाही.
शांत साधा सरळ दिसत असलो, तरी आहे एक धोंडा.
आता गर्दीत सुध्दा एकटाच असतो, एकलकोंडा.
