एकजुटीची पंगत
एकजुटीची पंगत
1 min
236
एकजुटीची पंगत
जूही आणि जूई
दोघीजणी जुळया.
एकजुटीने बाई
लाटतात पोळ्या.
जुळवाजुळव
करतात भारी.
स्वयंपाकाला
लागतात सारी.
अंजू आणि मंजू
जुड्या निसतात.
गजू आणि राजू
भाताला जुपतात.
संजूने काढली
जुनी भांडी सारी.
विजूने केली
जेवणाची तयारी.
वैजूने वाढली
काजूची कढी.
साजूक तुपाची
शिऱ्याची वडी.
सारीच भावंडे
पंक्तिला बसली.
मिळून सगळी
पोटभर जेवली.
