STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

एकदा तरी..

एकदा तरी..

1 min
191

एकदा तरी तु मला स्मरावे

संपला श्वास जरी तुझ्या उरात उरावे....

एकदा तरी तु शब्दांस न्याहाळावे

त्यांनी ओळखावे तुला ,तु त्यांना ओळखावे

एकदा तरी तु दुःख देखणे द्यावे

वेदनेच्या घावासही मी हसत हसत सोसावे...

एकदा तरी तु माझे सांत्वन करावे

मी असेल समाधीस्थ तु मला आळवावे

एकदा तरी तु माझे जीवन व्हावे

सारे निसटुन गेल्यावर तु माझ्यात तुला शोधावे !!!!!


Rate this content
Log in