एकांतीची हाक
एकांतीची हाक
1 min
279
आज सजलेल्या
बाजारात रौनक वेगळी...
कुटुंबातील सगळ्याची
ती धावपळ वेगळी...
वाटले मला ही रे आता
असावे आपले कोणी?
बायकोचे हेवेदेवे
नाही मिळता रुसणे...
मनमुराद होता पूर्ण
तिचे गोड ते हसणे...
एक दिप तिच्या साथीचा
एक दिप माझ्या प्रेमाचा
रंग रांगोळीतील उधळून
आयुष्य नाही बेरंग होऊ द्यायचे...
घर असे स्वप्नाचे आपले
आपणच असे सजवायचे...
दिवाळीच्या चैतन्याचा
साज गं साजनी फुले दे !
एकांताची ही हाक माझी
आता ऐकून घे...
