एकांताचे महत्व
एकांताचे महत्व
कोरोना नामक । विषाणू जन्मला।
भारतात आला । छुप्या मार्गी ॥ १॥
पाळू नका संग । जण माणसांचा ।
भला एकांताचा । मार्ग गड्या ॥ २॥
होतसे लागण । फक्त माणसाला ।
स्पर्श माणसाला । करू नका ॥ ३॥
साखळी बनते । कोरोना रोगाची ।
दाहकता याची । जग सोसे ॥ ४॥
भयान सकाळ । उगवली आहे ।
संकटात आहे । विश्व सारे ॥ ५॥
निसर्ग शक्तींना । करितो प्रार्थना ।
विश्वाच्या यातना । क्षमवाव्या ॥ ६॥
पुरे झाला आता । मानव संहार ।
मानतो मी हार । तुझ्यापुढे ॥ ७॥
सुखी भव सर्व । माणसाची जात ।
टळों अपघात । एकदाचा ॥ ८॥
एकांत महात्मे । सर्वांनी पाळावे ।
कोरोना टाळावे । या मार्गाने ॥ ९॥
दिनु विनवणी । करासी जोडूनि ।
राहावे सर्वांनी । सदा गृही ॥ १०॥
