STORYMIRROR

Rahul Salve

Others

3  

Rahul Salve

Others

एकांत

एकांत

1 min
225

काल रात्री एकांती फोटो तिचा बघितला

चेहरा तिचा पाहून गहिवरत रडलो होतो


वाटत होते रात्र ही कधीही न सरावी

एवढा तिच्या आठवणीत जागलो होतो


समोर दिसत होता इंद्रधनू तिच्या प्रेमसरीचा

सप्तरंगी सौंदर्यात तिच्या मी रमलो होतो


स्वप्नवत वाटावी ही दुनिया सारी एकदाची

एवढा तिच्या प्रेमात मी ओढलो होतो


भेटी होत्या कधी तरीच्या तुरळक क्षणी

तरीपण भान हरपून सोबत जगलो होतो


कशी समजूत काढावी या मनाची निरंतर

इथून जाता जाता सहवास तिचा हरलो होतो


Rate this content
Log in