एकांत
एकांत
1 min
403
बसावे शांत एकट्याने
कल्लोळ मनी नको कुठला
सखे - सोबती कोणी नको
नको आधार पुन्हा कुठला
नकोत वचने, नको शपथा
नको संकटे, नको विपदा
मोह नको अन् स्वप्नही नको
पुन्हा गुंतणे आता नको
हवी मुक्तता पाशातुनी
संसाराच्या जाचातुनी
नको उत्तरे नि प्रश्न नवे
विरक्त जीवन मजला हवे
श्वासांची लय, यावि ऐकू
नाही दुसरा, कुठलाही स्वर
मी शोधावे, मलाच पुन्हा
अन् भेटावा, मजसि ईश्वर
