एकांत तीरावरला..
एकांत तीरावरला..
सांजवेळ ती रम्य, सूर्य अस्तास निघाला,
भावला मला तो शांत एकांत तीरावरला
लाटांचा खळखळाट पाण्याचा आवाज स्पर्शताच देहाला वारा सुगंधी रोम रोम शहारला...
पाहून पसरलेल्या निळ्या सागरास त्या खिडकीतून मनाच्या एक कवडसा आत आला
रोमांचित झालेल्या देहास त्याने स्पर्श मखमली थंड गारव्याचा सहवास दिला...
पावलांचे ठसे होते उमटलेले तेथे आत्ताच येऊन मी गेलो ही साक्ष द्यायला
एकही लाट नाही आली त्याच्या जवळी नाही दिले पुसू माझ्या त्या पावलांच्या ठशांला...
आली वादळे, मोठे तुफानही आले एकांत तिथला माझा तरीही नाही विरला
क्षणोक्षणी आठवतो छळतो मजला एकांत त्या निळ्याशार सागराच्या तीरावरला...
