STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

2  

Sushama Gangulwar

Others

एका आईची व्यथा

एका आईची व्यथा

1 min
338

आईच्या ममतेची नाही तुला जान 

तुला वाढवण्यासाठी विसरते ती भूक आणि तहान 

म्हातारपणी तिलाच तु टाकतोस गहाण 


ज्या लेकरासाठी हिंडली ती किती दिशा 

तिचाच बघ केलस तु आज कशी दशा

जन्मदात्या आईलाच वापरतोस अभद्र भाषा


तुला ती कधीही काहीच ना मागते 

तुझ्या लेकराना डोळे भरून बघते 

तुझा फुललेला संसार बघण्यासाठीच तर ती जगते 


कस कळत नाही रे तुला एका आईची व्यथा 

जिच्या चरणांवर ठेवावे सकाळी उठताच माथा 

तिच्याच म्हातारपानाचे सांगत फिरतो भाकड कथा 


आई म्हनजे माया, आपुलकी , ममतेची अथांग सागर 

स्वतःच्याच घरात बनवू नको तिला चाकर 

या पापी पोटासाठी फक्त तुला मागते एक भाकर


तुझ्या भविष्यासाठी घालायची ती फाटकी साडी 

आज ना मागते ती तुला बंगला गाडी 

तुझ्या घरच्या कोपऱ्यात दे तिला जागा थोडी 


तूझ्या सुखासाठी दिवस रात्र कष्ट करते ती माऊली 

आज म्हातारपणी तु बन तिची सावली 

तुझ्या प्रत्येक संकटात तर तिच आहे ना धावली 


तुला जन्माला घालण्यास ती किती सोसली वेदना 

आज का तुला जाणवत नाही तिच्या संवेदना 


तुझ्याच आयुष्यात तु येवढा झालास व्यस्त 

स्वतःच्या आईच्या म्हातारपणाला झाला तु त्रस्त 

जन्माला घालणाऱ्या माईच जीवन आहे का रे स्वस्थ 


 कितीही त्रास दिलास तरी तुझी आई तुला म्हणते गुणी 

आईच्या चरणात आजन्म रहावे तिची ऋनी


Rate this content
Log in