एक वाईट स्वप्न
एक वाईट स्वप्न
1 min
272
सत्य आयुष्यात घडून
जेव्हा मन ते नाकारते
तेव्हा ते एक वाईट स्वप्न होते..
हसत खेळत चालणाऱ्या
आयुष्यात आई-वडीलाचं
छत कायमस्वरूपी हरवतं...
तेव्हा जखमी अश्वत्थामानी
मन ही दुखात जखमी होऊन
तडफडत असते.
मनाला रक्ताच्या धारे सारखे
अश्रूंच्या धारा पाझरु लागतात..
नाही मरण येत
नाही यातनेतून सुटका होते..
ती वेळ ही शत्रू सारखी
वैऱ्याची भासते .
आयुष्यातील कधी न
विसरता येणारे ते दुख
म्हणजे माझ्यासाठी
एक वाईट स्वप्न आहे..
एक वाईट स्वप्नच आहे...
