STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

एक वादळ शोधतोय मी

एक वादळ शोधतोय मी

1 min
234

एक वादळ शोधतोय मी 

प्रचंड क्षमतेचं 

मनात कापरं आणणारं 

सनातनी विषारी वृक्षांना 

मुळासकट उपटून टाकणारं 


एक वादळ तू निर्माण केलं होतंस 

शोषित समाजाच्या मनाच्या गाभाऱ्यात 

एक गती तू निर्माण केली होतीस 

आमच्या मनात उठणाऱ्या 

बंडखोरीच्या वाऱ्यात 


याच वादळाने उधळून दिले 

मनोरे सडक्या मनुवादाचे 

सैतानालाही लाजवणाऱ्या 

विषारी जातीयवादाचे 


पण आज गतीच मंदावलीय त्या वादळाची 

राहिली ती फक्त झुळूक 

संथ, सुस्तावलेल्या मनात 


कारण आमच्या पिढीच्या हातात 

करवंटी कधी आलीच नाही 

म्हणून आम्हाला त्या मनुवादाच्या चक्कीत 

भरडल्या जाणाऱ्या 

अस्पृश्यांच्या मनात उठणाऱ्या 

वादळाची जाणीव कधी झालीच नाही 


आयतं गुलामगिरीमुक्त जीवन मिळणाऱ्या 

मिजासखोरांना 

तुझ्या विचारांचं वादळ 

कळणार कसं 

गळ्यात अडकवलेलं 

गुलामगिरीचं मडकं 

गळणार कसं 


या विचारानं 

मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय 

म्हणूनच एक वादळ शोधतोय मी 

प्रचंड क्षमतेचं 

मनात कापरं आणणारं 

सनातनी विषारी वृक्षांना 

मुळासकट उपटून टाकणारं


Rate this content
Log in