STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

एक पत्र

एक पत्र

1 min
1.0K

एकदा आजोबा दिसले मला

ते आमच्यात नसताना

लगेच घेतलं पत्र काढलं

जे लिहिलं होतं मी

ते आमच्यात असताना


दाटलेल्या डोळ्यातली

मग ओघळली धार

रंग उडालेली होती शाही

अक्षरं धुसर होती फार

सांगायचे होते ते राहून गेले


शब्द कळत नव्हता त्यावरचा

एकही मला वाचताना

पुन्हा आजोबा दिसले मला

झपाझप पावलं टाकत

माझ्याचकडे येताना


पण मला चुकवून न बोलता

फडताळातलं एक गाठोड

त्यांनी दिलं मला

रागाने सोपवताना

तेच पत्र होतं त्यात


कोरं करकरीत

सुवाच्य अक्षरात

सारं काही कळलं होतं त्यांना

मी काही लिहिलेलं नसताना

त्यानंतर मात्र आजोबा

दिसले मला...

नेहमीच चंद्रचांदण्यात

मनमुराद हसताना!


Rate this content
Log in