STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

एक मे (1)

एक मे (1)

1 min
11.7K

सोळाव्या दिवसाची सांज...!

सोळावं वरीस धोक्याचं

इतकंच माहीत होतं

पण

सोळावा दिवस धोक्याचा झाला

आणि

लॉकडाऊन परत वाढला


दिवास्वप्न पाहात होतो

तीन तारखेच्या भाग्योदयाचं

म्हटलं चला संपला वनवास

मुक्त स्वातंत्र्याची पहाट

दोनच दिवसांवर आली

हळूच मनात

आनंदाने उसळी खाल्ली

पण क्षणात हलली दिल्ली

ओशाळली गल्ली

आणि काय

असेच होते

नको नको ते हल्ली...!

पुन्हा लॉकडाऊन...!

शुभसंध्या...!


Rate this content
Log in