"एक मागणं "
"एक मागणं "
1 min
13.8K
सगळं सुखचं
नको देऊ देवा
दुःखाची ही टोचणी
टोचू दे जीवा
जीवनात असावीच
संकटाची नाजूक कळ
तरच सुखासाठी आणिन
मी देहात बळ
सुखाचा सागरचं
जर मिळाला मला
नाही मिळणारचं
दुःख कधी पहायला
मिळालं सहज सगळं च
नाही जीवनास अर्थ
संकटाशिवाय जगणं म्हणजे
जीवन ही व्यर्थ
जीवनात समस्यांची
असावीच जळजळ
तरच प्रयत्नांची
राहिल सुरु वळवळ
वास खमंग भाकरीचा
जेव्हा तापतो तवा
सुलाखून निघू दे
देह माझा देवा
