STORYMIRROR

Anu Dessai

Others

4  

Anu Dessai

Others

एक कविता आईसाठी...

एक कविता आईसाठी...

1 min
177

नऊमास अंकुरले

स्वर्ग होता माझ्यासाठी

जग असेल विरोधी

तू होतीस माझ्या पाठी


संपवते त्रास सारे

आई तुझी एक मिठी

करे तृप्त मन माझे

तुझ्या हातचीच पिठी


कवडसा दूर दिसे

अथांग सागर तटी

आई तुझ्या प्रेमाला गं

नसतात कधी अटी


आज शुभ मातृदिनी

वंदन हे कोटी कोटी

भाग्योदय माझ्या भाळी 

जन्म मिळे तुझ्या पोटी


Rate this content
Log in