STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

एक कटाक्ष टाक प्रेमाचा

एक कटाक्ष टाक प्रेमाचा

1 min
398

एक कटाक्ष टाक प्रेमाचा 

इतर काही मी मागत नाही 

खरंच सांगतो तुला असा 

विक्षिप्त मी कधी वागत नाही ||0||


भेटण्यासाठी तुला आता  

सतत एक्साइटेड असतो मी 

जाणून घे ही रिऍलिटी

विनाकारण का हसतो मी 

असंच रॅन्डमली हृदयात कोणाच्या 

प्रेम कधी जागत नाही 

खरंच सांगतो तुला असा 

विक्षिप्त मी कधी वागत नाही ||1||


हरवून गेलोय प्रेमात तूझ्या 

शोधूनही मी सापडत नाही 

स्ट्रेन्जर वाटतोय मित्रांनाही 

असं कधी घडत नाही 

कोणालाही मी हरवल्याचा 

थांगपत्ता लागत नाही 

खरंच सांगतो तुला असा 

विक्षिप्त मी कधी वागत नाही ||2||


कोण कधी हृदयात कोणाच्या 

घर असं करून जातं 

आकाशाइतकं प्रेम मनात

अलगद असं भरून जातं 

माझं मात्र तुझ्याशिवाय 

आता मुळीच भागत नाही 

खरंच सांगतो तुला असा 

विक्षिप्त मी कधी वागत नाही ||3||


बहर प्रेमाचा येतो तेंव्हा 

प्रेम दिसतं चराचरात 

निसर्गाच्या प्रत्येक पातळीत 

निसर्गाच्या प्रत्येक थरात 

एकही ऋतू अपवाद नाही 

अशी कोणती मशागत नाही 

खरंच सांगतो तुला असा 

विक्षिप्त मी कधी वागत नाही ||4||


Rate this content
Log in