STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

एक कप चहा

एक कप चहा

1 min
12.2K

काहीजणांना कळणार नाही 

चहाचं महत्व

सकाळी उठल्यावर चहा हवाच

हेच त्यांचं तत्व


डोळे उघडल्यावर 

हाती मोबाईल हवा

त्यासोबत चहाचा

एक प्याला ही असतो हवा


सकाळच्या गडबडीतही

असतो चहाचाच आधार

एक कप चहा,बिस्कीट खाऊन

ती ऑफिस ला जायला तय्यार


5 स्टार हॉटेलपेक्षा 

वाटतो टपरीवरचा चहा बरा 

मित्रांसोबत गाप्पा मारत

गोठभर चहा पिण्यात आनंद खरा


थकल्या-भागल्या जीवाला

एक कप चहाने मिळतो तजेला

नवरोबा होतो खुश

जर असेल बायकोने आलं टाकून केलेला    


Rate this content
Log in