STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Others

2  

दिपमाला अहिरे

Others

एक कप चहा!!

एक कप चहा!!

1 min
94

बिनचुक भेट होते ज्याची रोज सकाळी

गरमागरम, वाफाळता आणि किणकिणता

आवाज असतो एक कप चहा ||१||


आधुनिकतेच्या पडद्याआड लपत चाललेला

आपलेपणाचा तो एक कप चहा ||२||


पुर्वी गावात पैसा कमी पण, मनाची होती श्रिमंती.

जिव्हाळ्याचे नाते जपणारा दुवा बनायचा

 तो एक कप चहा ||३||


उन्हे कलली की, ज्येष्ठांना चहाची आठवण येई,

किती वाजले पोरांनो प्रश्न विचारले जाई.

घाईगडबड, तारांबळ,सुनांची धावपळ उडवणारा

एक कप चहा ||४||


चहा साखरे साठी मग पोरांना दुकानात पिटाळले जाई

अंगणातील शेळी,बकऱ्यांचे दुध धुतले जाई.

दांडी नसलेला कप,बशी नाही म्हणून घेतलेली ताटली,वाटी,फुलपात्र सारा लवाजमा एकत्र करणारा एक कप चहा ||५||


फुरक्या मारत, आनंद घेत पिला जाणारा

कधी थंडा तर कधी गरम एक कप चहा ||६||


पाहुणा येता एका घरी, चहासाठी आमंत्रण असायचे त्याला घरोघरी

नको, नको म्हणता-म्हणता आपुलकीने

पाजला जायचा तो आग्रहाचा एक कप चहा ||७||


असायचा तो चुलीवरचा,धुरकटलेला,कमी दुधाचा, बिगर दुधाचा,काळा आणि गुळाचा पण मायेच्या गोडव्याने ओतप्रोत भरलेला असायचा

तो एक कप चहा ||८||


सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा

एक कप जरी घेतला तरी

 गावाकडील माणसाच्या चेहऱ्यावर समाधान आणणारा असायचा तो एक कप चहा ||९||


आज आहे सर्वांकडे ग्रीन टी,लेमन टी

डीप करून पिण्याचा छोटा पॅकेट वाला चहा

पण सर नाही त्याला, माणुसकी जपणारा असायचा

तो एक कप चहा ||१०||


चहा पीत असतांना कुणी अचानक आलेच

तर त्यालाही अर्धा कप देता येईल

या विचाराने बशीत ओतून पिला जाणारा

तो एक कप चहा ||११||


Rate this content
Log in