एक काव्य
एक काव्य
1 min
431
नाचे विठ्ठल मम अंगणी
नाही भेदा भेद मनी
दिंडी पताका शिवार फूलला
भक्ति रसाचा मला पिकाला
पांडुरंग च माझ्या ध्यानी
काम क्रोधा ची बांधून मोट
प्रेम रसाचा घालुनी पाट
पाटा मधे झुलझुल पाणी
टाळ मृदङ्ग वीणा हाती
शिवरी वैष्णव नाचती
साक्ष्यात नामदेव जनी
तूच माता तूच पिता
तू भ्राता तूच त्राता
तू ब्रह्मांड तूच धरणी
घाली लोटांगण तव चरणी