STORYMIRROR

Devendra Ambekar

Others

3  

Devendra Ambekar

Others

एक झाड होते...

एक झाड होते...

1 min
1.1K


एक कल्पवृक्ष होते

त्या बांधावरती उभे

असे खंबीर पणे

पण आता ते

मला पाहते थोडे

असे गंभीर पणे,


आधी होती त्याच्या

वरती फुलपानांची

खूपच दाटी

अन पक्ष्यांचा

किलबिलाट होत

असे रोज पहाटी

एक कल्पवृक्ष होते

त्या बांधावरती ......


त्याच्या छायेत खेळती

तान्ही गोंडस लेकरे,

अन थकलेला वाटसरू

विश्राम करी तिथे,

घट्ट पकड ठेवुनी मुळाशी

दुसऱ्याची सेवा करण्यास

उभे असे भूमी वरती

एक कल्पवृक्ष होते

त्या बांधावरती......


पण आता त्या

वृक्षाची तोड करुनी

एक भव्य इमारत

उभी करूनी,

तोडून जाती भूमातेशी

जुळलेली ती नाती

एक कल्पवृक्ष होते

त्या बांधावरती ......



Rate this content
Log in