STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

एक जानेवारी दोन हजार वीस.!

एक जानेवारी दोन हजार वीस.!

1 min
297

एक जानेवारी दोन हजार वीस....!

ए कदाच मज देव भेटला

क से काय चालले म्हणाला

जा म वैतागलो म्हणता

ने ट बंद कर म्हणाला....!

वा  टले वाटते तितके सोपे नाही

री ओढण्यात काही अर्थ नाही

दो न वेळ जेवण नसले जरी

न मन करितो नेट दे अखंड हरी....!

ह सला गालातच

जा तथास्तु म्हणाला

र डू नको बाबा आज तरी

वि क्षिप्त रे तू नेटकरी....!

स  माधानाने जरा घे आता

     डिजिटल झाला देश जाता जाता

     कोणाची का असेना सत्ता

     गिरवू नको नेटसाठी कित्ता....!

     नववर्ष हे तुझे

     आनंदात जावू दे

     मलाही अधी मधी

     सुट्टी थोडी मिळू दे...!

     हे कलियुग आहे

     याचे भान राहू दे

     इतरांनाही तुझ्या बरोबर

     थोडा लाभ घेऊ दे.....!

     इतके म्हणून पुन्हा हसला

     आणि डोळे रोखून

     हवं ते कर म्हणताच

     माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ...!


Rate this content
Log in