STORYMIRROR

Yogesh Nikam

Others

4  

Yogesh Nikam

Others

एक घटका

एक घटका

1 min
109

एक घटका सागरी किनारी सखे तुझ्या सोबती

हातात हात घेवूनी जन्मोजन्मीची आयुष्यभराची विश्रांती

नजरेला तुझ्या नजर भिडता मन उडती सात आसमंती

विरहाचा विचार करता जगण्याची नव्हे काही आसक्ती..!


दुरुनच वारा धावत येतां बट तुझ्या केसांची अलगद ऊडत जाई

नयनांवरची बट सावरतां सौंदर्य तुझे खुलतच जाई

प्रीतीच्या हास्य मैफिलीत रमतां गालावरची खळी उमलत जाई

एक घटका सागरी किनारी सखे तुझ्या सोबती...!!


सादगीच्या तुझ्या हाकेला माझ्या हळव्या मनाचा स्पर्श होई

तु जवळ येता हृदयाच्या स्पंदनाला तुझ्या धडकनचा भास होई

माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच श्वास दरवळत जाई

एक घटका सागरी किनारी सखे तुझ्या सोबती...!!!


रजनीच्या काळोखामंधी रुप तुझं चांदण्यालाही

लाजवत जाई

तु समोरी असताना वेगळ्या विश्वात माझे भान हरवत जाई

तु सोबत असताना संपुर्ण जग जिंकल्यागत वाटत जाई

एक घटका सागरी किनारी सखे तुझ्या सोबती...!!!!


एक घटका सागरी किनारी सखे तुझ्या सोबती

माझ्या ओठांवर असते फक्त तुझ्या कोडकौतुकांची महती

हाक देतां तू जीवनाच्या साथीची माझे जीवन असेल तुझ्या चरणांती

सोडून जाता तू मजला देईल मी माझ्या प्राणांची आहुती....!!!!


Rate this content
Log in