एक घार
एक घार
1 min
11.6K
पाहिली आज मी
आकाशात दुर दुर
उडणारी एक घार
लहानगे घरटे तिचं
पण असायचं उघडे
नेहमी घरट्याचे दार
वाहणारा दृष्ट वारा
करायचा तो तिच्या
पंखावर नेहमी वार
तिच्या डोळ्यात हो
दिसले मला उद्याची
मोठाली स्वप्न फार
आई ,बाबा, भाऊ
आणी ती , कुटुंबात
लोक फक्तचं चार
जिवनाची हि परिक्षा
कधी जिंकायची ती
कधी व्हायची हार
नेहमी शोधातो मी
माझे कुठे दिसते
का आज ती घार