STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

एक गाव हवाहवासा

एक गाव हवाहवासा

1 min
402

खेडेगाव माझे आजोळ

जातिवंत शेतकऱ्यांनाचे

स्वभावाने प्रेमळ सारे

भोळ्या अंतःकरणाचे


जन्म जाहला जेथे

खोली होती अडगळीचिं

सांगते माय माऊली माझी

कथा सारी हाल अपेष्टाचिं


पैशाने जरी गरीब

मनाने बहु श्रीमंत

आपुलकी नात्याचिं

बंध जुळतात अनंत


आठवते मजला आजही

धमाल खोड्करि सारी

दिले प्रेम भरभरून

आजी आजोबांचिं आभारी


सुवास मातीचा तिथल्या

ओलावा दरवळतो नात्यातला

राहणे सदा एकोप्याचे

स्मरतो एकेक व्यक्ती घराघरातला


स्वच्छंदी  हरेक क्षण क्षण

जगले मनमुराद कण कण

माया लावली अतोनात

आठवणी वाहतात नयनातून


जगू वाटते ते दिवस

पुन्हा लहान होऊन

परी रिंगण मर्यादाचे

पाऊल घेते मागे गहीवरुन



Rate this content
Log in