STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

एक दिवाळी अशीही

एक दिवाळी अशीही

1 min
308

दरवेळी तेच, तेच पदार्थ

दरवेळी माणसे तीच, तीच

दरवेळी तीच ,तीच रांगोळी 

पूजा करणारीही ती मीच...


दोन हजार दहा साली आम्ही

अनोखी दिवाळी साजरी केली

अनाथ मुलांच्या भावविश्वात

वसुधा मनसोक्त नहाली...


गेले कुटुंबासमवेत अनाथालयी

मायेनं मुलांची विचारपूस केली

दिवाळीचा फराळ घातला मुखी 

माझी मुलंही त्यांच्यात छान रमली...


मुलं होती एकूण तीथं सोळाजण

माझ्या कुटुंबाला पाहून जवळ आली

काही लहान तर काही होती मोठी

एक सहा मासाचे लेकरू पाहून हरवून गेली...


या मुलांच्यात दिनभर आम्ही राहिलो

हसलो आनंदाची लयलूट मस्तच केली

सर्व मुलं आमचा फराळ खाण्यात दंग झाली

माझ्या मनाला एक शांतता मिळाली...


असाही एक दिवस आपण साजरू करते

अनाथ मुलांच्या भावविश्वात रमते

त्यांचे आई,बाबा,भावंडे बनून राहते

दुःखाची किनार कमी करण्याचा प्रयत्न करते...


दीपपूजा यांची मनोमन करते 

पणत्यांचाच दिवाळसण मनवते...


Rate this content
Log in