STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

एक ढग

एक ढग

1 min
372

एक ढग इथंही दाव देवा

अन् येऊ दे समद्या गावात पूर

वाहून जाऊ दे म्हातारी माय माझी

अन् तिचा दुःखाने दाटलेला ऊर


थांग पत्ता बी नगं बापाला

अन् शोधू दे साऱ्या रानावनात ती कांती

रडू दे त्याच्या काळीजकोंडीला

अन् भरू दे समद्या भेगाळलेल्या मूठमाती


तो फासही ओला होऊ दे

अन् भिजू दे माळवदाची बिती कहाणी

ढग फुटून बारबार ऐसा बरसू दे

अन् होऊ दे त्राहीमाम करपल्या रानी


पाट वाहू दे वावरात साऱ्या

अन् घुमू दे दगड माथ्याची जुबानी

बांध-बांध सारे फुटू दे

अन् होऊ दे कष्ट सारे चिखलपाणी


टाक भेदरून बोडके रानमाळ

अन् कर्कश होऊ दे किंकाळी

मिटू दे तृष्णा एकदाचीच सारी

अन् निघू दे रात गर्द नभातून काळी


एक ढग खरंच दाव देवा

अन् दिसू दे भयंकर पाणी-पाणी

मिटू दे मरण कोरड्या डोळ्यातले आता

अन् थांबू दे वनवास हा, चालला अनवाणी... चालला अनवाणी...


Rate this content
Log in