STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

एक आठवण

एक आठवण

1 min
103

शनिवार सुप्रभात....!

श रम वाटली पाहिजे

ला ज वाटली पाहिजे

वा चून ऐकून पाहून

र मत गमत नोव्हेंबर सरला....!

सु रुवात ओढून ताणून करून

प्र भावीपणे सत्ता हाती आली

भा ग्यही खुलले आणि

त लवार म्यान झाली....!

   

आता

   वर्षाचा शेवटचा महिना

   उद्यापासून सुरू होणार

   आणि एक नवीन

   इतिहास लिहिला जाणार...


   पाच वर्षे स्वच्छ प्रशासन देणारा

   पहिला बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री

   सर्वांत अल्पकालीन मुख्यमंत्री

   म्हणून इतिहास नोंदही घेणार...


   आणि जाता जाता

   नवीन वर्षासाठी हा शेवटचा महिना

   मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन

   याचीही आठवण कोरणार...  

   

त्याच बरोबर

   आमचाच मुख्यमंत्री, स्वप्नाची पूर्तता

   आम्ही करून दाखविलं

   आम्ही कुस्ती मारली

   याची पण पाटी लागणार...


   पण

   आज या सर्व गोष्टीवर

   शिक्कामोर्तब होणार

   आणि सत्यमेव जयतेचा

   साक्षात्कार पुन्हा एकदा होणार...


   किती किती छान महिना गेला

   याचीही आता इतिहास दखल घेणार

   आणि सरत्या वर्षाला निरोप देताना

   इतके दाखवून इतिहास वर्तमानात

   पिक्चर अभी बाकी है म्हणणार...


   आणि...

   एक आठवण

   मनात कायमची ठेवणार

   ठेविले अनंते तैसेचि रहावे

   हेच अंती पुन्हा पुन्हा सांगणार..!

सुप्रभात..!


Rate this content
Log in